मित्राशी वाद झाल्याने विवाहितेची आत्महत्या

    दिनांक :30-Mar-2021
|
नागपूर, 
मित्रासोबत वाद झाल्याने प्रयासनगर, घोगली येथे राहणार्‍या धनदेवी सुनील राऊत (35) या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. धनदेवीला पती आणि दोन मुले आहेत. तिचा पती सुनील राऊत हा नागपूर मनपात सफाई कामगार म्हणून कार्यरत आहे. 2016 मध्ये राऊत हे वकीलपेठ येथे राहत होते. त्यावेळी त्यांच्याकडे योगेश उके हा किरायाने राहत होता. त्यातच धनदेवी आणि योगेश यांच्यात सूत जुळले. ही माहिती सुनीलला समजताच त्याने 2020 साली प्रयासनगर, घोगली येथे घर बांधले आणि धनदेवीसोबत तो तेथे रहायला गेला. तरीही योगेश आणि धनदेवी यांचे संबंध सुरूच होते. सुनील कामावर गेला की, योगेश तिच्या घरी येत असे. त्याचप्रमाणे तासनतास दोघेही मोबाईलवर बोलत असत.
 
nff_1  H x W: 0
 
काही दिवसांपूर्वी धनदेवी आणि योगेश यांच्यात वाद झाला. तेव्हापासून ती निराश झाली होती. आता जगण्यात काहीच अर्थ नाही असे ती बोलून दाखवायची. सुनीलने तिची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. सोमवारी सकाळी 9.÷30 च्या सुमारास धनदेवीने आपल्याच घरी विष प्राशन केले. सुनीलच्या लक्षात हा प्रकार येताच त्याने तिला मेडिकलमध्ये भरती केले. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
 
 
पतीशी वाद झाल्याने पत्नीची आत्महत्या
घरगुती वादातून पतीसोबत वाद झाल्याने सुरक्षानगर येथे राहणार्‍या ज्योती पद्ममेश रबडे (40) या महिलेने विष प्राशन करून आत्महत्या केली. ज्योती पती पद्ममेश हा वाडी येथील मर्सडिज बेंच वर्कशॉप येथे सुपरवायझर म्हणून कार्यरत आहे. घरगुती कारणावरून रबडे दाम्पत्यांमध्ये वाद होत होता. 27 मार्च रोजी सकाळी याच कारणावरून त्यांच्यात वाद झाला. या वादावादीत तिने विष प्राशन केले. तिची प्रकृती बिघडल्याने तिला लता मंगेशकर हॉस्पिटल येथेे भरती केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.