कोरोना रुग्णांवर नपची करडी नजर

    दिनांक :30-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
वर्धा,
वर्धा शहराध्ये कोरोना विषाणूचा प्रार्दुभाव वाढत असून मोठया प्रमाणात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना तपासणी सकारात्मक असणार्‍या पण कोरोना लक्षणे नसलेल्या कोरोना संसर्ग बाधितांना गृहविलगीकरण बंधनकारक असुन सुध्दा काही कोरोना बाधित व्यक्ती बाहेर फिरत आहेत.
 
wedas_1  H x W:
 
अश्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त होत असल्याने त्यांच्यावर नगर पालिका करडी नजर ठेवून असून त्यांना 2 हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचे नपचे मुख्याधिकारी बिपीन पालिवाल यांनी कळवले आहे. शहरातील कोरोना रुग्णांना रोज भेटी देऊन असे रुग्ण गृहविलगीकरणाचे पालन करतात की नाही याची तपासणीसाठी महिला बचत गटांच्या सदस्यांना नेमण्यात आले आहे. नप शिक्षकांचे तीन पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाव्दारे गृहविलगीकरणातील व्यक्तीना रोज भेटी देण्यात येत आहे. तसेच नपने 18002706700 हा टोल फ्री क्रमांक सुरू केला असून कोरोना बाधित गृहविलगीकरणात असणार्‍या व्यक्ती घराबाहेर फिरताना आढल्यास या क्रमांकावर फोन करून माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.