राणा दाम्पत्याच्या फोटोला चपलांचा हार

    दिनांक :30-Mar-2021
|
- शिवसैनिकांनी केला निषेध
तभा वृत्तसेवा
अमरावती, 
हिंदूचा व आदिवसी बांधवांच्या परंपरेचा अवमान केल्याचा आरोप करून मंगळवारी शिवसैनिकांनी उग्र आंदोलन करत राणा दाम्पत्या फोटोला चपलांचा हार घातला आणि त्यांच्या कृत्याचा कडाडून निषेध केला.

am_1  H x W: 0  
 
हिंदू धर्मात फुलांचा आणि शेणाच्या गौर्‍यांचा हार घालून होळी पेटविण्याची परंपरा आहे. होळीच्या सणाला हरिसाल येथे खा. नवनीत व आ. रवी राणा यांनी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणासाठी कारणीभूत ठरलेल्या विनोद शिवकुमार आणि श्रीनिवास रेड्डी यांचा निषेध करण्यासाठी त्यांचे फोटो होळीला लावले व त्याला चपलांचा हार घातला होता. त्यानंतर होळी पेटविली. हा प्रकार होळीचा व हिंदूच्या भावनांचा अवमान असल्याचा आरोप करून शिवसैनिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळवारी जोरदार घोषणाबाजी केली. राणा दाम्पत्याचे हे कृत्य धार्मिक भावना भडकविणारे असल्याने या दोघांवरही गुन्हे दाखल करा, अशी मागणी शिवसेनेने जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी राणा दाम्पत्यासह दोनही वन अधिकार्‍यांच्या फोटोलाही चपलांचा हार घालून निषेध नोंदविण्यात आला. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, महिला आघाडीच्या मनीषा टेंम्बरे, वर्षा भोयर, कांचन ठाकूर, महानगर प्रमुख पराग गुडधे यांच्यासह आदी सहभागी झाले होते. जिल्ह्यात अन्य काही ठिकाणी याच स्वरूपाचे आंदोलन शिवसैनिकांनी केले.