उपाययोजनांमुळे मेट्रोत सुरक्षित प्रवास

    दिनांक :30-Mar-2021
|
- आंशिक टाळेबंदीत सेवा सुरूच
नागपूर,
कोरोना वायरसचा वाढता प्रादुर्भाव बघता मेट्रो प्रवासी सेवा प्रवाशांकरीता सुरक्षित असून नागरिकांचा प्रवास सुरक्षित असावा या करीता वेळोवेळी उपाय योजना महा मेट्रो द्वारे करण्यात येत आहे. महा मेट्रो तर्फे 50 टक्के प्रवासी क्षमता प्रमाणे ऑरेंज आणि अ‍ॅक्वा लाईन वर मेट्रो सेवा सुरु आहे. कोरोना वायरसच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य सुरक्षेसंबंधी आवश्यक उपाय योजना प्रभावी पणे लागू आहेत. विषम परिस्थिती मध्ये मेट्रो परिवहन सेवा उपयुक्त असून मेट्रोचा प्रवास सुरक्षित आहे व मेट्रो स्टेशन व ट्रेनमध्ये विशेष सतर्कता बाळगली जात आहे.
 
ng_1  H x W: 0
 
महा मेट्रोच्या सर्वच स्टेशनवर येणार्‍या प्रवाशांचे तापमान तपासत त्यांना सेनेटाईजर दिले जाते. या शिवाय खापरी, सीताबर्डी इंटरचेंज आणि लोकमान्य नगर स्टेशन येथे पोहचल्यावर गाडीला सेनेटाईज करण्याकरता कर्मचारी तैनात आहेत. गाडी रवाना होण्यापूर्वी प्रत्येक कोच मधील सीट, खिडकी, हॅन्डल बार, दरवाजा सेनेटाईज केला जातात. या शिवाय, खापरी आणि लोकमान्यनगर डेपोमध्ये स्वयंचलित मशीनच्या माध्यमातून गाडीची आंतर-बाह्य सफाई करण्यात येत असून संपूर्ण गाडी सेनेटाईज केली जाते.
 
 
ज्या प्रवाशांचे तापमान 38 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त असेल किंवा ज्यांना सर्दी, खोकला तसेच श्वास घेण्यात त्रास होत असेल अशा प्रवाशांना सक्त मनाई करण्यात येतआहे. भौतिक दूरतेच्या संबंधी मानकांचे पालन करण्याकरिता स्टेशनवरील तिकीट खिडकी, प्लॅटफॉर्मसह मेट्रो गाडीत त्या संबंधी दिशा-निर्देश देण्यात आले आहेत. प्रवाशांनी डिजिटल पद्धतीने प्रवास-भाडे द्यावीत याकरिता त्यांना प्रोत्साहित केले जात आहे उपकरणांना स्पर्श कमी व्हावा या करीत हे पाऊल उचलण्यात आले आहे. महा मेट्रो अ‍ॅपचा वापर करावा या करता प्रवाशांना माहिती देण्यात येत आहे. जमा झालेली रोख-रक्कमेचे विशिष्ट उपकरणांच्या माध्यमाने अल्ट्रा-व्हायलेट किरणांच्या मदतीने निर्जंतुकीकरण केले जात असून येणारी तसेच जाणारी रोख-रक्कम वेगळी ठेवण्यात येते. सर्व मेट्रो ट्रेन आणि स्टेशनचे सातत्याने निर्जंतुकीकरण करण्यात केले जात आहे. मेट्रोचे कर्मचारी हातमोजे व मुखाच्छादन परिधान करीत आहे . या शिवाय बेबी केयर कक्ष, तिकीट खिडकी, स्टेशन कंट्रोल कक्षाची ठराविक वेळानंतर सफाई करण्यात येत आहे.