तिथीनुसार शिवजयंती उत्सव

    दिनांक :30-Mar-2021
|
- आज साध्या पद्धतीने साजरा होणार
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
छत्रपती शिवाजी महाराज जयंती हा उत्सव तिथीनुसार बुधवार, 31 मार्च 2021 रोजी साजरा केला जाणार आहे. कोविड 19 मुळे उद्भवलेल्या संसर्ग परिस्थितीचा विचार करता यावर्षी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव साध्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे.
 
aasa_1  H x W:
 
यवतमाळातील 91 वर्षे जुन्या, 1931 पासून तिथीनुसार पारंपरिक शिवजयंती उत्सव धूमधडाक्यात साजरा करणार्‍या शिवाजी चौकातील शिवजयंती उत्सव समितीनेही यंदा शोभायात्रेसह प्रभातफेरी, दौडस्पर्धा, पोवाडे, व्याख्यानासह इतर सांस्कृतिक कार्यक्रम रद्द केले आहेत. सकाळी केवळ शिवपूजन करण्यात येईल, अशी माहिती शिवाजी मंडळाचे सचिव चंद्रकांत गड्डमवार यांनी दिली.