दोघा कोरोनाबाधितांची आत्महत्या

    दिनांक :30-Mar-2021
|
नागपूर,
शहरात दोन कोरोनाबाधित इसमांनी गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली असून दोन्ही घटना अजनी परिसरातील आहेत. पहिली घटना मेडिकलच्या ट्रॉमा सेंटर येथील शौचालयात घडली. रामबाग येथे राहणार्‍या पुरूषोत्तम अण्णाजी गजभिये (81) यांना कोरोनाने ग्रासले होते.
 
ngp_1  H x W: 0
 
त्यांनी घरगुती उपचार केले परंतु, त्यांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. त्यामुळे 26 मार्च रोजी मेडिकलच्या ट्रॉमा सेंटरमधील कोव्हिड वार्डात त्यांना भरती केले होते. त्यांच्यावर उपचार देखील सुरू होते. श्वास घ्यायला त्रास होत असल्याने त्यांना ऑक्सीजन मास्क लावण्यात आला होता. परंतु, त्यांच्या प्रकृतीत काहीच फरक पडला नाही. त्यांची प्रकृती खालावत चालली होती. त्यातच कुटुंबातील सदस्य त्यांच्याकडे लक्ष देत नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते त्रस्त झाले होते. या कारणावरून सोमवारी सायंकाळी कोव्हिड वार्डातील एक्झॉस्ट पंख्याला ऑक्सीजन मास्कचा पाईप बांधून गळफास लावला. बराच वेळा झाला तरी ते शौचालयातून बाहेर न आल्याने वार्ड बॉयने आत जावून पाहिले असता गजभिये गळफास लावलेल्या असवस्थेत दिसून आले. याप्रकरणी अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
 
 
दुसरी घटना 85 प्लॉट येेथे घडली. वसंतराव रामराव कुटे (60) यांनाही कोरोनाने ग्रासले होते. त्यांच्यावरही घरगुती उपचार सुरू होते. परंतु, त्यांच्या प्रकृतीत काहीच फरत पडत नव्हता. या कारणामुळे मंगळवारी सकाळी त्यांनी आपल्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.