सिलेंडरचा स्फोटाने घराला आग

    दिनांक :30-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
पुलगाव,
स्थानिक शिवाजी कॉलोनीतील संदीप बिरे यांच्या घरी सिलेंडरचा स्फोट झाल्याने प्रचंड आग लागली .परिसरातील नागरिकांनी तातडीने मदत करून आग विझवली. ही आग मध्यरात्री १.३० वाजताच्या सुमारास लागली. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप यांच्या पत्नी स्वाती बिरे यांना स्वयंपाक घरात प्रकाश दिसला, त्यांनी पती संदीप यांना उठविले.त्यांनी स्वयंपाक घरात डोकावले असता सिलेंडरने पेट घेतल्याचे दिसले. प्रसंगावधान राखत त्यांनी स्वयंपाक घराचे दार व खिडक्या उघडल्या. सिलेंडरवर पाणी ओतुन विझवन्याचा प्रयत्न केला व ते बाहेरच्या बाजुला ढकलले. परंतु तोपर्यंत स्वयंपाक घरातील वस्तु व बाजुच्या खोलीतील पडद्याने पेट घेतला होता. पडलेल्या सिलेंडर चा अचानक स्फोट झाला. 

c_1  H x W: 0 x
 
 
आगीने भडका पकडला. आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यांनी घरातील विद्युत पुरवठा बंद करून मदत सुरू केली. आग आटोक्यात येत नसल्याने नगर परिषद अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वाशिंग मशीन सह घरातील बरेच साहित्य जळले. तातडीच्या मदतीने आग आटोक्यात आली. सुदैवाने बिरे दाम्पत्य व दोन मुलींना कोणतीही इजा झाली नाही. रवि पाठक, सुनिल बेलपांडे, गजानन धांदे,संतोष बैतुले यांनी आग विझवण्यास मदत केली. सेवा फाऊंडेशन चे अध्यक्ष व नगरसेवक मंगेश झाडे यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले. या आगीत बिरे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.