गाडीवाला आया घर से कचरा निकाल.....

    दिनांक :30-Mar-2021
|
बंडूभाऊ लांजेवार
कुरखेडा.
गाडी वाला आया घर से कचरा निकाल या राष्ट्र भाषेतील सुमधुर आवाजातील गीताने कुरखेडा वासियांची सकाळ सुमधुर तर होतच आहे. सोबतच नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव सुद्धा करून देत आहे. राज्य शासनाने सहा वर्षापूर्वी तालुकास्तरावर असलेल्या सर्व ग्रामपंचायतीचे नगरपंचायत मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला.  त्यानुसार कुरखेडा ग्रामपंचायतचेसुद्धा नगरपंचायतमध्ये रूपांतर करण्यात आले. तेव्हापासून खासगी कंत्राटदारा मार्फत शहरातील साफसफाई करण्यात येत आहे. 

un _1  H x W: 0
 
येथील नगरपंचायतीच्या स्थापनेपासून शहरांमध्ये स्वच्छ शहर मोहीम राबविण्यात येत असून यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केल्या जात आहेत.  नुकताच नगरपंचायतीने शहरातील कचरा गोळा करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत अंदाजे एकेविस लक्ष रुपये खर्च करून तीन चारचाकी वाहने खरेदी केले असून त्याद्वारे शहरातील कचरा गोळा करण्यात येत आहे. या गाडीमध्ये दोन कप्पे असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला त्यावर झाकणे लावलेली आहेत. यात ओला कचरा व सुका कचरा वेगवेगळ्या कप्यात गोळा करण्यात येत आहे. यासोबतच प्रत्येक गाडीवर असलेल्या गाडीवाला आया घरसे कचरा निकाल.... या सुमधुर गीतामधून समाज प्रबोधन करण्यात येत असून नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव सुद्धा करून देण्यात येत आहे.