सैलानीत मुजावर परिवाराने पेटविली छोटेखानी होळी़

    दिनांक :30-Mar-2021
|
धाड,  
सैलानीतील होळी प्रसिद्ध आहे. गेल्या वर्षी व यंदाही कोरोनाच्या पृष्ठभूमीवर होळीदहनाने प्रारंभ होणारी सैलानी बाबांची यात्रा रद्द झाली. मात्र होळी पेटविण्याचा मान असलेल्या मुजावर परिवाराने आज छोटेखानी होळी पेटवून परंपरा कायम ठेवली आहे. हिंदु-मुस्लिम एकतेचे प्रतीक हाजी हजरत अब्दुल रहमान उर्फ सैलानी बाबा यांच्या वार्षिक यात्रा उत्सवाचा आरंभ होळी दहनने होते. देशभरातुन लाखो भाविक सैलानी बाबांच्या यात्रा उत्सवात सहभागी होतात. मागील वर्षी व यावर्षी जिल्हा प्रशासनाने कोरोना विष्णुचा प्रादुर्भाव लक्षात घेता ही यात्रा रद्द केली आहे. 

dhana _1  H x W
 
दरगाह जवळ एका मोठ्या शेतात मुजावर परिवारातील सदस्य होळीला दहन देऊन यात्रा उत्सवाला आरंभ करतात. परंतु यंदा जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्द केली असून आपली परंपरा कायम ठेवत मुजावर परिवारातील सदस्यांनी प्रशासनाला सहकार्य करत सैलानी बाबा यांच्या दरगाहजवळ 28 मार्च रोजी दुपारी छोटेखानी होळी दहन केले. यावेळी शेख कासम मुजावर, शेख शफीक मुजावर, पंचायत समिती सदस्य शेख चांद मुजावर, उपसरपंच शेख जहीर मुजावर सह पोलीस व महसूल प्रशासन सुद्धा हजर होते.