राज्यशास्त्र शिक्षकांची संघटना मजबूत करण्याची गरज

    दिनांक :30-Mar-2021
|
- राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषद मजबूत करण्यासाठी राज्यशास्त्राच्या सर्व प्राध्यापकांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. ही परिषद अजून मजबूत झाल्यास राज्यशास्त्र विषय शिकवणार्‍या सर्व शिक्षक, अध्यापक आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यास कटिबद्ध असेल. यासाठी परिषदेत सर्व सभासद व शिक्षक यांच्या सहकार्याची गरज आहे. आपले संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे असे आवाहन राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार यांनी केले.

yet_1  H x W: 0 
 
राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेच्या यवतमाळ जिल्हा कार्यकारिणी आणि राज्य कोअर कमिटीची यांची संयुक्त सहविचार सभा गुगल मीट आभासी माध्यमाद्वारे संध्याकाळी 5:30 वाजता पार पडली. या सभेचे आयोजन यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वनाथ उईके आणि जिल्हा कार्यकारिणीने केले. या सहविचार सभेचे अध्यक्षस्थान राज्याध्यक्ष प्रा. सुमित पवार यांनी भूषवले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. सुरेश नारायने, राज्य उपाध्यक्ष प्रा. शरद जोगीराज्य व डॉ. पितांबर उरकुडे, महासचिव प्रा. भगवान चौधरी, कार्याध्यक्ष प्रा. स्मिता जयकर, कोषाध्यक्ष प्रा. सुनील राठोड, सहसचिव प्रा. जयश्री कळसकर, अमरावती विभाग पालक डॉ. ज्योती गावडे, राज्य कार्यकारिणी सदस्य प्रा. धनंजय किंबहुने, प्रा. मनोज जाधव, विभागीय अध्यक्ष प्रा. संजीव वाहुरवाघ, महासचिव प्रा. गणेश जाधव, राज्य व यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीसह इतर जिल्ह्यातील राज्यशास्त्राचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते. राज्यशास्त्राचे अध्यापन करणार्‍या शिक्षकांमध्ये एकजूट निर्माण व्हावी या हेतूने 9 जून 2020 रोजी राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय परिषदेची स्थापना करण्यात आली. सर्व मान्यवरांनी परिषदेचा उद्देश स्पष्ट केला. तसेच नवीन व जुन्या अभ्यासक्रमाबाबत चर्चा करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांनी परिषदेबाबत आपले विचार मांडले. राज्यशास्त्र विषयाशी संबंधित विविध साहित्य निर्माण करण्याचा ध्यास यावेळी परिषदेने घेतला.
 
 
अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात यवतमाळ जिल्हा व राज्य समितीची सहविचार सभा पार पडली. या सभेचे प्रास्ताविक विभागीय अध्यक्ष प्रा. मनोज जाधव यांनी व स्वागत प्रा. गणेश जाधव यांनी केले. परिचय प्रा. संजीव वाहुरवाघ यांनी करून दिला. जिल्हा कार्यकारिणीचा परिचय जिल्हाध्यक्ष प्रा. विश्वनाथ उईके यांनी करून दिला. सूत्रसंचालन प्रा. दिनेश सूर्यवंशी यांनी व आभारप्रदर्शन प्रा. किशन हुबांड यांनी केले. तंत्रस्नेही म्हणून प्रा. गजानन रंदळे यांनी काम पाहिले. प्रा. सुरेश नारायणे, प्रा. शरद जोगी. डॉ. पितांबर उरकुडे, डॉ. ज्योती गावडे यांनी मार्गदर्शन केले.