एका मृत्यू सह आज 37 नवीन कोरोना बाधित तर 32 कोरोनामुक्त

    दिनांक :30-Mar-2021
|
गडचिरोली,
आज जिल्हयात 37 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 32 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 10555 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 10033 वर पोहचली. तसेच सद्या 411 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 111 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज नवीन एका मृत्यूमध्ये 80 वर्षीय महिला उच्च रक्तदाब व मधुमेह आणि हदय विकाराने ग्रस्त होती. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 3.89 टक्के तर मृत्यू दर 1.05 टक्के झाला.
 
ngp_1  H x W: 0
 
नवीन 37 बाधितांमध्ये गडचिरोलीतील 28, अहेरी 1, भामरागड तालुक्यातील 7 कुरखेडा 1, जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 32 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 15, अहेरी 6, आरमोरी 6, एटापल्ली 3, सिरोंचा 1, तर वडसा मधील 1 जणांचा समावेश आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील बाधितामध्ये , अयोध्यानगर 6, कलेक्टर कॉलनी 1, वसा 4, काबरा बद्रर्स 1 , पोस्ट ऑफीस जवळ 2, नवेगांव कॉम्पलेक्स 1, आर्शिर्वाद नगर 3, आयटीआय चौक 1, कारगीर चौक 1, रिलायन्स पेट्रोल पंप 1, पोस्ट कॉलनी 1, कनेरी 1, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये 6, एलबीपी हेमलकसा 1, तर इतर जिल्हयातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे.