यवतमाळ जिल्हा हादरला, दोन दिवसांत 28 मृत्युंसह 585 नवे बाधित

    दिनांक :30-Mar-2021
|
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
कोरोनाचे यवतमाळ जिल्ह्याला हादरे देणे सुरूच आहे. गत दोन दिवसांत जिल्ह्यात 28 मृत्युंसह 585 जण नव्याने बाधित आले आहेत. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह विविध कोविड केंद्रांमधील 832 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

ytrt_1  H x W:  
 
जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सोमवारच्या मृतांमध्ये यवतमाळचे 56, 82, 68, 73, 73, 77 वर्षीय पुरुष आणि 65 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 68 आणि 63 वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील 32 वर्षीय पुरुष, दिग्रसचा 85 वर्षीय पुरुष, तर तालुक्यातील 45 वर्षीय पुरुष आणि पुलगाव (जि. वर्धा) येथील 72 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच मंगळवार, 30 मार्चच्या कोरोनाबाधित 247 जणांमध्ये 166 पुरुष आणि 81 महिला आहेत. यात यवतमाळातील 123, वणी 25, पांढरकवडा 24, बाभुळगाव 17, दारव्हा 17, पुसद 10, उमरखेड 10 प्रमुख आहेत. मंगळवारी एकूण 1972 अहवाल प्राप्त झाले. यापैकी 247 जण नव्याने बाधित, तर 1725 अहवाल कोरोनामुक्त आले. सध्या जिल्ह्यात 2409 कोरोनाग्रस्त उपचार घेत असून आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 28,136 झाली आहे. 24 तासांत 312 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 25,082 आहे. तर जिल्ह्यात एकूण 645 मृत्युंची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 2,65,455 नमुने तपासणीस पाठविले असून यापैकी 2,57,941 अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 2,29,805 नागरिकांचे नमुने आतापर्यंत कोरोनामुक्त आले आहेत.