काटेपूर्णा प्रकल्पात 40 टक्के जलसाठा

    दिनांक :31-Mar-2021
|
- मूबलक जलसाठ्याने 5225 हे.शेतीचे सिंचन
- गहु, हरभरा व इतर पिके जोमदार
अकोला,
अकोला शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात मंगळवार, 30 मार्च रोजी 34 दक्षलक्ष घनमीटर म्हणजेच 40 टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. यंदा पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने अकोलेकरांना उन्हाळ्यात पाणी टंचाईची झळ बसणार नाही. मूलबक पाणी पुरवठ्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी रबी हंगामात जलसाठ्याचा लाभ घेतला. या हंगामात गहु, हरभरा व इतर रबी हंगामातील पिके शेतकर्‍यांनी घेतली आहे. काटेपूर्णा प्रकल्पातील जलसाठ्यातून सुमारे पाच हजार 225 हेक्टर जमीनीला सिंचनाचा लाभ झाला आहे.
 
 
jal_1  H x W: 0
 
अकोला, बार्शिटाकळी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये रबीचे पिके शेतात दिसून येत आहे. गत वर्षीच्या पावसाळ्यात काटेपूर्णा प्रकल्प तुडुंब भरला होता. यंदा त्याचा वापर सिंचनासाठी जलसंपदा विभागाने केला. त्याचा फायदा स्थानिक शेतकर्‍यांना झाला. सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकर्‍यांनी गहु, हरभरा व इतर भाजीपाला पिके घेतली. सिंचनासाठी पुरेसा पाणीसाठा मिळाल्याने शेतकर्‍यांच्या हाती हरभरा व गहु पीक चांगले आले आहे. तर काटेपूर्णा प्रकल्पात अद्यापही पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्याने अकोला शहराला पाणीटंचाईचा फटका बसणार नसल्याचे जलसंपदा विभागाने स्पष्ट केले आहे.
 
 
 
काटेपूर्णा प्रकल्पात मंगळवार, 30 मार्च रोजी 34 दक्षलक्ष घनमीटर पाणीसाठा आहे. जो 40 टक्के इतका आहे. उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन आणि इतर पाण्याचा नाश पाहता अकोलेकरांना यंदा पाणीटंचाईची झळ बसणार नसली तरी महानगरपालिकेने पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.