खबरदार...गृह विलगीकरणाचे नियम न पाळल्यास

    दिनांक :31-Mar-2021
|
- कोविड विषाणू तपासणीस नकार दिल्यास गुन्हा
वाशीम,  
गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलेल्या व्यक्तींनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवण्याचे, तसेच कोविड विषाणू तपासणीस नकार दिल्यास अशा नागरिकांवर साथरोग अधिनियम 1897 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत.
 
corona_1  H x W
 
लक्षणे असणार्‍या कोविड बाधितांना व गृह विलगीकरण नियमांचे पालन न करणार्‍या रुग्णांना संस्थात्मक विलगीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. रुग्णांची परिस्थिती पाहून आरोग्य विभागाने रुग्णाला संस्थात्मक विलगीकरण म्हणजे कोविड केअर सेंटर अथवा कोविड केअर हॉस्पिटल किंवा डेडीकेटेड कोविड हॉस्पिटल यापैकी एका संस्थेमध्ये ठेवण्यात येणार आहे.