पक्ष्यांची पाण्याची सोय करत साजरी केली होळी

    दिनांक :31-Mar-2021
|
बुलडाणा, 
यावर्षी होळीवर कोरोनामूळे बंदी आली. शहरात हा सण साधेपणाने साजरा झाला. मात्र वन्यजीव सोयरे यांनी ज्ञानगंगा अभयारण्यात पक्ष्यांसाठी 30 पाणी पात्र लावून उन्हाने व्याकूळ होणार्‍या पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करून होळी व रंगपंचमी साजरी केली आहे. दरवर्षीप्रमाणे या ही वर्षी बुलडाणा येथील वन्यजीव सोयरे यांनी 29 मार्च रोजी सकाळी 7 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ज्ञानगंगा अभयारण्यात जाऊन 6 ठिकाणी वनातील पक्षांचा विचार करून पिण्याच्या पाण्यासाठी मातीचे 30 पॉट लावले. होळीपासून ऋतुत बदल होऊन हिवाळा संपूर्ण उन्हाळ्याची सुरुवात होत आहे.
 
bul _1  H x W:  
 
याचा विचार करून येत्या उन्हाळ्यात वनातील पशू पक्षांचे पाण्यासाठी हाल होऊ नयेत म्हणून अनोख्या पध्दतीने होळी आणि धूलिवंदन साजरी केली. होळीपासून ऋतुत बदल होऊन हिवाळा संपूण उन्हाळ्याची सुरुवात होत आहे या उपक्रमाला वन विभागातील कर्तव्यावर कार्यरत असलेल्या वन कर्मचार्‍यांनी देखील साथ दिली. वन्यजीव सोयरेंनी या मोहिमेसाठी ‘चिवचिव ये दाना दाना खा पाणी पाणी पि भूर उडून जा’ हे घोषवाक्य देऊन मातीची पात्रे लावली. या मोहिमेत वन्यजीव सोयरे प्रा.डॉ.देवकर, प्रा.डॉ.वानखेड़े, विजय बलांसे, उदय उपाध्याय, अनिल अंभोरे, श्रीकांत पैठने, सागर आवटे, जयंत हिंगे, प्रकाश डब्बे, शाम राजपूत, मयुर निकम, नितिन श्रीवास्तव यांनी परिश्रम घेतले.