नांदेड ते श्री गंगानगर एक्सप्रेस 1 एप्रिलपासून

    दिनांक :31-Mar-2021
|
अकोला,
अकोल्यातील प्रवाशांना राजस्थानकडे जाण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेची नांदेड ते श्री गंगानगर एक्सप्रेस ही साप्ताहिक गाडी दर गुरूवारी अकोल्याहून उपलब्ध होणार आहे. रेल्वेने 1 एप्रिलपासून ही गाडी सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, तुर्तास आरक्षण असणार्‍या प्रवाशांनाच या गाडीतून प्रवास करता येणार आहे.
 
 
rail_1  H x W:
 
दक्षिण-मध्य रेल्वे नांदेड विभागातून एप्रिल महिन्यात नव्या सहा विशेष गाड्या सुरु करणार असून, यापैकी नांदेड - श्री गंगानगर साप्ताहिक गाडी 1 एप्रिलपासून सुरु होणार आहे. आठवड्यातून दर गुरुवारी धावणारी ही गाडी अकोला स्थानकावरून जाणार असल्याने राजस्थानकडे जाण्यासाठी आणखी एक गाडी अकोलेकरांना मिळाली आहे. गाडी क्रमांक 07623 नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर गुरुवार) ही गाडी 1 एप्रिल पासून नांदेड येथून सकाळी 06.50 वाजता सुटेल आणि बसमत हिंगोली, वाशीम, अकोला , शेगाव, सुरत, वडोदरा, अहेमदाबाद, अबु रोड, जोधपुर, बिकानेर मार्गे श्री गंगानगर येथे दुसर्‍या दिवशी रात्री 19.20 वाजता पोहोचेल. ही गाडी दर गुरुवारी अकोला स्थानकावर येईल. तर गाडी क्रमांक 07624 श्री गंगानगर ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शनिवारी) ही गाडी 3 एप्रिल पासून श्री गंगानगर येथून दुपारी 12.30 वाजता सुटेल आणि बिकानेर जोधपुर, अबुरोड, अहेमदाबाद, वडोदरा, सुरत, शेगाव, अकोला, वाशीम, हिंगोली, बसमत मार्गे नांदेड येथे तिसर्‍या दिवशी रात्री 02.30 वाजता पोहोचेल. ही गाडी दर सोमवारी अकोला स्थानकावर येईल.