अज्ञात वाहनाच्या धडकेत रिक्षा चालक ठार

    दिनांक :31-Mar-2021
|
हिंगणघाट,
अज्ञात वाहनाच्याधडकेत गरीब रिक्षा चालक जागीच ठार झाल्याची घटना काल ३० रोजी रात्री राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात घडली. प्राप्त माहितीनुसार नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील आजंती शिवारात काल रात्री ८ वाजताच्या सुमारास सायकल रिक्शा चालक नामदेव तुकारामजी भडे (५५) रा. संत तुकडोजी वार्ड हे सायकल रिक्षा घेवुन महामार्गाने निघाले. यावेळी भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनाने रिक्षाचालकास मागुन येत जबर धडक दिली. यात रिक्षा चालक नामदेव भडे हा गंभीर जखमी होऊन घटनास्थळी मृत्यु दिला.
 
axc _1  H x W:  
 
सदर अपघाताची माहिती जाम महामार्ग पोलिस चौकशीला मिळताच सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील पोलिस कर्मचारी सुधाकर बावणे,गौरव खरवडे , शरद इंगोले , कांचण नव्हाते , दिनेश धवणे, दिलीप वांदिले यांनी घटनास्थळी पोहचुन मृतकाचे प्रेत उत्तरीय तपासणीकरीता स्थानिक उपजिल्हा रूग्णालयात पाठविले.अपघातप्रकरणी पुढिल तपास हिंगणघाट पोलिस करीत आहे.