जबरी चोरीत वाशीमचे दोघे अटकेत

    दिनांक :31-Mar-2021
|
- दीड लाखांचा मुद्देमाल जप्त, तीन दिवसात प्रकरणाचा छडा
अकोला,
पातूर येथे गेल्या तीन दिवसांपूर्वी मळसूर येथील विलास यशवंत काळे यांच्याजवळचे एक लाख रुपये चाकूचा धाक दाखवित लुटारुनी लांबविले. या प्रकरणात स्थानिक गुन्हेशाखेने तपास केल्यावर वाशीम येथील दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात 1 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
 
 
rob_1  H x W: 0
 
अकोला येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतून हरभरा पिकाचे पैसे घेत मळसूर येथे जाताना विलास काळे या शेतकर्‍याच्या दुचाकीचे पेट्रोल संपले. त्यांनी रस्त्यावर मदत मागितली तर मदत देणारे चोरटे निघाले. नांदखेड फाटा येथे त्यांनी चाकूचा धाक दाखवित त्यांच्या जवळील पैसे हिसकावले. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक मुकुंद देशमुख यांनी तांत्रिक विश्लेषणाची माहिती घेत व गोपनीय तपास करत विजय भोलाप्रसाद गुप्ता वय 25 रा.राममंदिर मागे वाशीम तसेच लखन अरुण गवळी वय 19 रा. वाशीम यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी आरोपीकडील 1 लाख रुपये व गुन्ह्यात वापरलेली गाडी, मोबाईल फोन असा दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.आरोपींना पातूर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.