अनोखे...केवळ महिलांचे गाव

    दिनांक :01-Apr-2021
|

१२३_1  H x W: 0
 
प्रिटोरिया,
जगाच्या नकाशावरील कोणतेही गाव असो त्या गावांमध्ये स्त्री आणि पुरुष एकत्र राहणे ही नैसर्गिक गोष्ट मानली जाते. पण आफ्रिका खंडातील एका गावामध्ये एकही पुरुष राहत नाही. या गावांमध्ये पुरुषांना येण्यासाठी आणि राहण्यासाठी संपूर्णपणे प्रतिबंध करण्यात आला आहे. आफ्रिका खंडातील केनया या देशातील उमोजा नावाच्या गावातील हि परिस्थिती आहे. 31 वर्षापूर्वी या गावामध्ये 15 महिलांनी राहण्यास सुरुवात केली होती. आता हे गाव संपूर्णपणे फक्त महिलांचे झाले आहे. साधारण 30 वर्षापूर्वी उत्तर केल्या मध्ये राहणाऱ्या झेन नोल नावाच्या एका महिलेवर ब्रिटिश सैनिकांनी बलात्कार केला होता. हि घटना समजल्यावर या महिलेच्या पतीने तिला घराबाहेर काढले. त्यानंतर आसरा शोधत शोधत ती या गावामध्ये पोहोचली तेव्हा तिला समजले की या गावामध्ये एकही पुरुष राहत नाही.
 

१२३_1  H x W: 0
 
अश्या महिला राहतात गावात
बलात्कार पीडित महिला किंवा पुरुष अत्याचाराने त्रस्त झालेल्या महिला या गावांमध्ये राहात असतात. तेथील स्थानिक प्रशासनाने या गावांमध्ये राहायला आलेल्या महिलांच्या नावावर जमीन करण्यास प्रारंभ केला आहे. तीस वर्षांच्या कालावधीमध्ये या महिला ज्या जमिनीसाठी घाम गाळत आहेत. त्या जमिनी यांच्या नावावर करण्यात येणार आहेत. केनियात सर्वसाधारणपणे जमिनी या पुरुषांच्या नावावर असतात पण केनियामधील हे एकच गाव असे असणार आहे. ज्यामध्ये जमीनी या महिलांच्या नावावर असतील. या गावाचे नाव उमोजा असे असून आफ्रिकन भाषेमध्ये त्याचा अर्थ एकता असा होतो. गावांमधील सर्व व्यवस्था महिलाच पाहतात. गावातील शाळा ही महिलांनी सुरू केल्या आहेत. जंगलात सापडणारे मध आणि काही हस्तकला याच्या माध्यमातून या महिला आपला उदरनिर्वाह करत असतात.