सायलीचा नववधू लूक

    दिनांक :06-Apr-2021
|

sayali_1  H x W
 
मुंबई,
'काहे दिया परदेस' या मालिकेतून मराठी कलाविश्वात पदार्पण करणारी अभिनेत्री सायली संजीवचे देशभरात असंख्य चाहते आहेत. मराठी मालिकांनंतर सायली मराठी चित्रपटांध्येही यशस्वी पदार्पण केलं. लवकरच ती झिम्मा या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आणि त्यानंतर चित्रपटाच्या ट्रेलरपेक्षा सायलीच्या नावाचीच सोशल मीडियावर अधिक चर्चा सुरू आहे. सायलीनं चित्रपटांमध्ये मात्र वैविध्यपूर्ण भूमिका साकरण्यावर भर दिला आहे. अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलेल्या सायलीनं प्रत्येक चित्रपटात वेगवेगळ्या धाटणीची भूमिका साकारली. झिम्मामध्येही ती एक वेगळ्या धाटणीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.