रायपूरमध्ये 10 दिवसांची संपूर्ण टाळेबंदी

    दिनांक :07-Apr-2021
|
रायपूर,
छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये 9 एप्रिल ते 19 एप्रिल दरम्यान संपूर्ण टाळेबंदी लावण्यात आली आहे. 9 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजतापासून ही टाळेबंदी सुरू होईल. रायपूरमध्ये मागील चोवीस तासांत 2,821 कोरोनाबाधित आढळले असून, 26 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सतर्क झालेल्या राज्य सरकारने हा निर्णय घेतला.

nat _1  H x W:  
 
छत्तीसगडमध्ये कोरोना संसर्गाची गती आतापर्यंतच्या सर्वांत वाईट टप्प्यावर पोहोचली आहे. एप्रिलच्या पहिल्या 6 दिवसांत राज्यात 37 हजार बाधित आढळले आहेत. 11 एप्रिलपर्यंत येथील विधानसभा सचिवालय देखील बंद ठेवण्यात आले आहे. 55 वर्षांवरील बाधितांना गृहविलगीकरणात राहता येणार नाही, असेही राज्य सरकारने जाहीर केले आहे. टाळेबंदीदरम्यान दारूची दुकाने बंद राहतील. यासह सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका इतर कार्यालये बंद ठेवण्यात येणार आहेत.