हृदयरोग्यांसाठी ‘अर्जुनामृत’ ठरतेय् अमृत

    दिनांक :07-Apr-2021
|
- वैद्यनाथ आयुर्वेदचे गुणकारी औषध
मुंबई,
शास्त्रोक्त पद्धतीने आयुर्वेद औषधे बनविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री वैद्यनाथ आयुर्वेद भवनद्वारा जडीबुटीवर सखोल अभ्यास करून हृदयरोग पीडितांसाठी अर्जुनामृत या औषधाची निर्मिती केली गेली आहे. हे गुणकारी औषध हृदयरोगींसाठी अमृत ठरत आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक ताण-तणावामुळे हृदयरोग बळावणार्‍यांना आयुर्वेदाने दिलेले हे वरदानच आहे.
 
mum_1  H x W: 0
 
मानसिक तणावामुळे शरीरातील रक्तसंचारात अनियमितता येऊन हृदयाच्या कार्यप्रणालीत अडथळे निर्माण होतात. शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्याने देखील हृदयरोग उद्भवतो. हृदयरोगाचा त्रास असणार्‍या व्यक्तींमध्ये श्वास लागणे, निद्रानाश, उच्च रक्तदाब, वारंवार लघवी लागणे, जीव घाबरणे, भोवळ येणे यासारख्या अनेक समस्या दिसून येतात. यावर प्रभावी आणि गुणकारी उपाय म्हणून वैद्यनाथने अर्जुनारिष्टापेक्षा अधिक परिणमकारक अर्जुनामृताची निर्मिती केली आहे. अर्जुन, विदारीकंद, कमलपुष्प, शतावरी, बला, वावडिंग व मनुकासारख्या जडीबुटींच्या मिश्रणाने हे रसायन परिपूर्ण आहे. आधुनिक विज्ञानाने प्रमाणित केले आहे की, अर्जुनामृतामधील मुख्य जडीबुटी असलेले अर्जुन हे हृदयाच्या त्रासात किंवा हृदयरोगात प्रभावी असून, कोलेस्ट्रॉलमुळे उद्भवणारी व्याधी देखील दूर करते. उच्च रक्तदाब असणार्‍या व्यक्तींसाठी देखील हे रसायन परिणामकारक आहे. प्राचीन आयुर्वेद ग्रंथात वर्णन केलेल्या पद्धतीने आयुर्वेद तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात हे बनविले जात आहे. हे रसायन आजच्या स्पर्धात्मक युगात हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी अमृतवल्ली आहे.