विराट कोहलीच्या टेन्शनमध्ये आणखी वाढ

    दिनांक :07-Apr-2021
|
मुंबई,
आयपीएल २०२१ येत्या ९ एप्रिल पासून सुरु होत आहे. अशात आरसीबी संघाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने विराट कोहलीच्या टेन्शनमध्ये आणखी वाढ झाली आहे. ९ एप्रिल रोजी विराट कोहली कॅप्टन असलेला संघ आरसीबी आताचा चॅम्पियन संघ मुंबई इंडियन्ससोबत आयपीएल 2021 चा पहिला सामना खेळणार आहेत. मात्र या सामन्या अगोदर आरसीबीकरता अतिशय धक्कादायक बातमी आहे. आरसीबी संघाचा आणखी एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे.

spo _1  H x W:
 
आयपीएलच्या सुरूवातीच्या अगोदरच रॉयल चॅलेंजर्स बंगलोरला मोठा झटका बसला आहे. आरसबीचा खेळाडू डॅनियल सॅम्स कोरोना संक्रंमणाचा शिकार झाला आहे. आरसीबीचा सलामी फलंदाज देवदत्त पडिक्कलनंतर डॅनियल सॅम हा दुसरा खेळाडू कोरोनाच्या विळख्यात अडकला आहे. कोरोनाबाधित झाल्यानंतर आता तो आयसोलेशनमध्ये आहे. डॅनियल सॅम्स चेन्नईत 3 एप्रिलपासून पोहोचला आहे. तेव्हा त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह होता. त्याचा दुसरा रिपोर्ट 7 एप्रिल रोजी आला. ज्यामध्ये त्याला कोरोनाची लागण झाली आहे.