नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी

    दिनांक :07-Apr-2021
|
मुंबई,
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अनेक जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तर काही ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील बुहुतांशी शाळा बंद करण्यात आल्या आहेत. पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेण्यात आला आहे. आता नववी आणि अकरावीसंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे.

st_1  H x W: 0  
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणार नाही. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे. यापूर्वी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता तर. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार आहे. या परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करायचा की नाही, याबाबतचा निर्णय पुढील दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला जाणार असल्याचंही शिक्षण विभागानं सांगितलं आहे.
अकरावीची प्रवेश प्रक्रिया जानेवारीपर्यंत सुरू होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अवघ्या दोन-तीन महिन्यांत परीक्षेला बसवायचे का, असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला होता. ऑनलाइन वर्गात अद्याप पन्नास ते साठ टक्केच अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवून अभ्यासक्रम पूर्ण करावा आणि त्यानंतर शाळा, महाविद्यालयांना मूल्यांकन करण्याची मुभा द्यावी, असे मत एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यांनी व्यक्त केलं होतं.