निरोगी जीवनशैली...

    दिनांक :07-Apr-2021
|
जागतिक आरोग्य दिन विशेष
नागपूर,
सध्या संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या संसर्गाशी झुंज देत आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाने गंभीर रूप धारण केले आहे. अशा नकारात्मक आणि भीतीच्या वातावरणामध्ये राहत असताना प्रत्येकाला निरोगी आयुष्याची गरज आहे. निरोगी जीवनासाठी खूप काही करायची गरज नसतेच. केवळ सध्या सध्या उपायांनी आपण कोरोनावर मात करून आपले आणि इतरांचे जीवन हेल्दी बनवू शकतो. आज ७ एप्रिल जागतिक आरोग्य दिनानिमित्त उत्तम आणि निरोगी राहण्यासाठी शिवाय हवामान बदलपासून आरोग्याचे रक्षण कसे करता येईल यासाठी केलेला हा प्रयत्न...

happy_1  H x W:
 
आहाराची विशेष काळजी
आयुष्यभर निरोगी राहण्यासाठी महत्त्वाची एखादी गोष्ट असेल तर ती म्हणजे आपला आहार. आपण सेवन करत असेलेल्या आहारावरून आपल्या निरोगी शरीराचे मोजमाप होत असते. आहारामधील असंतुलनामुळे आपण आजारी पडू शकतो. एव्हाना पडत असतो. आपल्या आहाराची विशेष काळजी घेत आपण हिरव्या भाज्या, धान्य, फळे इत्यादी पौष्टिक गुणधर्मांनी भरलेला आहार घ्यावा. हे शरीर निरोगी ठेवण्यासोबत आवश्यक पोषक द्रव्ये देखील पुरवते.
  
 
sleep_1  H x W:
 
झोपेचे योग्य गणितयोग्य वेळी झोपणे आणि उठणे हा निरोगी जीवनशैलीचा मंत्र आहे. जर आपण वेळेवर झोपलो आणि वेळेवर उठलो तर केवळ शरीर स्वस्थ राहत नाही तर आपला मेंदूही कार्यक्षम आणि सकारात्मक होतो. म्हणून आपल्या जेवणाच्या वेळेला अनुसरुन झोपण्याचे गणित बसवणे महत्वाचे आहे. आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी हा सर्वात खात्रीचा मंत्र असल्याचे सिद्ध झाले आहे. 
 
 
exce_1  H x W:  
 
व्यायामव्यायामाद्वारे केवळ आपल्याला फिटनेस मिळत नाही तर आपल्या शरीराची देखभालही होते. प्रत्येकाला सर्वोत्तम शरीर आणि फिटनेसची कमी-अधिक प्रमाणात आवड असते. लठ्ठपणा टाळण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. म्हणून निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. 
 
  
yoga_1  H x W:
 
प्राचिन काळापासून सुरू असलेला योग
आज योगाबद्दल हजारो संशोधन केले गेले आहे. संपूर्ण जगात देखील योगाला प्रोत्साहन दिले जात आहे. इतकेच नाही तर असे अनेक योगासन आहेत जे तुम्ही नियमित केल्याने निरोगी राहू शकता आणि तुमच्या शरीराला अनेक आजारांपासून दूर ठेऊ शकता. योगा करणे फार सोपे असून सकाळी किंवा संध्याकाळी घरी हे करू शकतो. म्हणूनच, एक चांगली जीवनशैली जगण्यासाठी योगाला आपल्या जीवनात स्थान द्यावे आणि निरोगी रहावे.
 
last_1  H x W:
 
शिस्त पाळा
निरोगी राहण्यासाठी प्रत्येक गोष्टीमध्ये शिस्त पाळणे गरजेचे आहे. आपण आपल्या जीवनाशी संबंधित शिस्त आपल्या आहारापासून ते आपल्या रोजच्या रूटीनपर्यंत ठेवली पाहिजे. वेळेवर खाणे, वेळेवर झोपणे, वेळेवर उठणे, वेळेवर व्यायाम, वेळेवर योग आणि वेळेवर ध्यान करणे यासारखे सर्व गोष्टींमध्ये निष्काळजीपणाने वागू नका.