भारतात जगातील सर्वाधिक वेगवान लसीकरण

    दिनांक :07-Apr-2021
|
अमेरिकेला टाकले मागे 
- साडेआठ कोटींचा टप्पा ओलांडला
नवी दिल्ली,
दररोज सरासरी 30 लाख 93 हजार नागरिकांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण करीत जगातील सर्वांत वेगवान लसीकरण करणारा देश म्हणून, भारताने अमेरिकेला मागे टाकले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने बुधवारी दिली.
 
ind _1  H x W:
 
भारतात 8.70 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले असून, मागील चोवीस तासांत 33 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. देशव्यापी लसीकरणाच्या 81 व्या दिवशी 33 लाख 33 हजार 601 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. यातील 30 लाख नागरिकांना लसीची पहिली, तर 3 लाख 29 हजार नागरिकांनी दुसरी मात्रा देण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण 13 लाख 32 हजार सत्रांमध्ये 8 कोटी 70 लाख 77 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. 89 लाख 63 हजार 724 आरोग्य कर्मचार्‍यांनी लसीची पहिली मात्रा घेतली असून, 53 लाख 94 हजार कर्मचार्‍यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे. 93 लाख 36 हजार 629 आघाडी कर्मचार्‍यांना लसीची पहिली, तर 43 लाख 12 हजार कर्मचार्‍यांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. 60 वर्षांवरील 14 लाख नागरिकांचे लसीकरण पार पडले असून, 45 वर्षांवरील 7 लाख नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला आहे.