करिना...चर्चा तर होणारच

    दिनांक :07-Apr-2021
|
मुंबई,
राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बॉलिवूडमधील अनेक कलाकारांना करोनाची लागण झाल्याचे समोर आहे. गोविंदा, अक्षय कुमार, विकी कौशल, आलिया भट्ट, कतरिना कैफ, परेश रावल, भूमी पडणेकर अशा अनेक कलाकरांची करोना चाचणी पॉझिटीव्ह आली. त्याअशात बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करिना कपूर खानने तोंडला लावलेल्या मास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
 

mask_1  H x W:
 
करिनाने तोंडाला मास्क लावलेला फोटो शेअर करत ‘हा कोणता प्रोपोगंडा नाही. मी फक्त मास्क लावण्याचे आवाहन करत आहे’ असे म्हटले आहे. पण फोटोमध्ये करिनाने तोंडाला लावलेल्या मास्कवर LV असे लिहिले आहे. या मास्कची किंमत $355 डॉलर आहे. म्हणजे जवळपास २४ हजार ९९४ रुपये. करिनाच्या या मास्कने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून सध्या चर्चेत आहे. करिनाने वापरलेल्या या काळ्या मास्कची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. हे मास्क दिसायला अगदी साधे असले तरी त्याची किंमत ऐकून थक्क झाले आहे.