कतरिनालाही कोरोनाची बाधा

    दिनांक :07-Apr-2021
|
मुंबई,
कतरिना कैफ हिचा कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बॉलिवूडवर कोरोनाचे सावट बघायला मिळत आहे. अक्षय कुमार, गोविंदा, भूमी पेडणेकर आणि विकी कौशल यांच्या पाठोपाठ आता अभिनेत्री कतरिना कैफ हिलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तिने स्वतःला आयसोलेट केले आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत कतरिनाने तिला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती दिली आहे.
 

katrina_1  H x
 
कतरिनाने लिहिले, 'माझी कोविड 19 ची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी स्वतःला आयसोलेट केले असून होम क्वारंटाइन आहे आणि सर्व प्रोटोकॉलचे पालन करत आहे,' असे कतरिनाने सांगितले आहे. सोबतच संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करुण घेण्याचे आवाहन तिने केले आहे. चाहत्यांना स्वतःची काळजी घ्या, असेही ती म्हणाली आहे. यापूर्वी रणबीर कपूर, दिग्दर्शक संजय लीला भन्साळी, आलिया भट्ट, आमिर खान, आर माधवन, परेश रावल, मिलिंद सोमण, रोहित सराफ, सिद्धांत चतुर्वेदी, मनोज बाजपेयी, कार्तिक आर्यन आणि सतीश कौशिक, फातिमा सना शेख, आदित्य नारायण आणि त्याची पत्नी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. रणबीर कपूर, कार्तिक आर्यन यांच्यासह अनेक सेलिब्रिटींनी कोरोनावर यशस्वी मात देखील केली आहे.