रबाडा, नॉर्टिज पहिला सामना मुकणार

    दिनांक :07-Apr-2021
|
मुंबई,
आगामी आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटलसचे प्रतिनिधित्व करणारे दक्षिण आफ्रिकेचे वेगवान गोलंदाज कॅगिसो रबाडा व अ‍ॅनरिच नॉर्टिज मंगळवारीच मुंबईत दाखल झाले. सात दिवसांच्या अनिवार्य विलगीकरणाच्या काळामुळे त्यांना चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या पहिल्या सामन्याला मुकावे लागणार आहे.
 
spo_1  H x W: 0
 
रबाडा व अ‍ॅनरिचचे मंगळवारी मुंबईत आगमन झाले असून ते हॉटेलमध्ये दाखल झाले. ते एक आठवडा विलगीकरणात राहतील, असे फ्रॅन्चाइझीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. गत आयपीएल मोसमात दिल्ली कॅपिटल्सला अंतिम फेरी गाठून देण्यात रबाडा व अ‍ॅनरिचने मोलाचा वाटा उचलला होता. मात्र अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभूत झाल्यामुळे श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचे पहिल्यांदाच आयपीएल चषक जिंकण्याचे स्वप्न भंग झाले व त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. श्रेयस दुखापतग्रस्त झाल्यामुळे आता दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी ऋषभ पंतवर आली आहे व तो संघाला विजेतेपद जिंकून देण्यास उत्सुक आहे.