राज्य सरकार बंद करणार आंतरराज्यीय बससेवा?

    दिनांक :07-Apr-2021
|
- लवकरच घोषणेची शक्यता
मुंबई,
राज्यात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असल्याने सरकार आणखी कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. या पृष्ठभूमीवरच आंतरराज्यीय एसटी वाहतूक बंद करण्याचा विचार राज्य सरकारकडून केला जात आहे.
 
maha_1  H x W:
 
महाराष्ट्रातून गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत एसटीची आंतरराज्य वाहतूक सुरू आहे. त्यापैकी मध्यप्रदेश सरकारने महाराष्ट्रातील एसटी वाहतूक आधीच बंद केली आहे. त्यामुळे आता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकार इतर राज्यातील एसटी वाहतूक बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत लवकरच अधिकृत घोषणेची शक्यताही सूत्रांनी वर्तवली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर राज्य सरकारने काही दिवसांपूर्वीच राज्यभरात निर्बंध लादले आहेत. मात्र, सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील, असे सरकारकडून सांगण्यात आले आहे.