सरोज चौकातील जुनी इमारत कोसळली

    दिनांक :07-Apr-2021
|
- मोठी दुर्घटना टळली
 
अमरावती, 
सरोज चौकातल्या हनुमान मंदिराजवळील 70 वर्ष जुनी शिकस्त इमारत मंगळवारी मध्यरात्रीनंतर कोसळली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झालेली नाही. 

tin_1  H x W: 0 
 
इमारत कोसळल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. त्यानंतर प्रशासनाला माहिती देण्यात आली. दोन वर्षापूर्वी सदर इमारतीत लॉज होता. इमारत शिकस्त होत असल्यामुळे तो बंद करण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या इमारतीच्या मालकाला मनपातर्फे नोटीसही देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही त्यांनी योग्य पाऊले उचलली नाही.
 
 
सरोज चौक परिसर नेहमीच गजबजलेला असतो. मध्यरात्रीनंतर इमारत कोसळल्यामुळे तेथे वर्दळ नव्हती. त्यामुळे कोणतीच दुर्घटनाही झाली नाही. दिवसा या इमारतीजवळ मोठ्या प्रमाणात हातगाडीवाले उभे राहतात. इमारत दिवसा कोसळली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. कोसळलेल्या इमारतीचा मलबा उचलण्याचे काम मनपाच्या वतीने सुरू करण्यात आले होते. अमरावती शहरात अशा आणखी काही शिकस्त इमारती आहे. प्रशासनाने वेळीच त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.