घटस्फोटानंतर भ्रूणाचा ताबा कोणाकडे?

    दिनांक :07-Apr-2021
|
न्यूयॉर्क,
जोडप्यांमध्ये झालेल्या वादांतून घटस्फोटाचा खटला उभा राहिल्यावर साधारणतः मुलांचा ताबा कोणाकडे यावरून वाद सुरू असतो. अमेरिकेत लॉकडाउनच्या काळात आयव्हीएफ उपचाराची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली होती. यावरून विभक्त होताना जोडप्यांमध्ये फ्रोझन भ्रूणवर कोणाचा हक्क असेल यासाठी जोडप्यांमध्ये वाद सुरू आहेत. अमेरिकेत गोठवलेल्या भ्रूणाच्या हक्कावरून अनेकजण कायदे तज्ज्ञांची मदत घेत आहेत. 
 
frozen _1  H x
अमेरिकन अभिनेत्री सोफिया वेर्गाराच्या खटल्यामुळे जाहिरपणे या विषयावर चर्चा सुरू झाली आहे. सोफियावर निक लोएब याने कोर्टाकडून भ्रूणाच्या कस्टडीची मागणी केली होती. परंतु, न्यायालयाने त्याच्याविरोधात निकाल दिला. घटस्फोटानंतर भ्रूणपासून बाळ हवे असल्याची मागणी केल्यास दुसऱ्या जोडीदाराला अडचणीत टाकण्यासारखा प्रकार होत असल्याचे सिलिकॉन व्हॅलीतील वकील मोनिका मेजेजी यांनी सांगितले.
 
एनवाययू लेंगोन फर्टिलिटी सेंटरचे डॉ. ब्रुक होड्स वर्ट्ज यांच्यानुसार अनेक कंपन्या विमा योजनेत आता फर्टिलिटी उपचाराचा समावेश करत आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने जोडप्यांकडून हा मार्ग निवडला जात आहे. जर, एखादे दाम्पत्य आपल्या भविष्यातील नात्यांबाबत निश्चित नसतील तर त्यांनी भ्रूणसोबत एगही गोठवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. अशा स्थितीत त्यांना आपल्या जोडीदारावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले. जोडप्यांनी स्वाक्षरी केलेल्या दस्ताऐवजांच्या आधारे दोघांच्या सहमतीने यावर निर्णय होईल असे न्यायालयाने नमूद केले.