पाण्यासाठी महिला नगरपंचायतवर धडकल्या

    दिनांक :07-Apr-2021
|
- घागर मोर्चा काढण्याचा इशारा
तिवसा, 
तिवसा शहरात गेल्या एक काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रभागातील महिलांनी बुधवारी नगरपंचायतवर धडक देत अधिकार्‍यांना चागलेच धारेवर धरले. यावेळी महिलांनी नगरपंचायत प्रशासना विरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. 
 
tivasa_1  H x W
 
नगरपंचायत अंतर्गत येणार्‍या काही प्रभागामध्ये चांगल्याप्रकारे पाणी पुरवठा होत असताना मोजक्याच काही ठिकाणी गेल्या 10 दिवसापासून पाणी पुरवठा खंडित झाला आहे. संबंधित अधिकारी व पाणी पुरवठा प्रमुख यांच्या चुकीच्या नियोजनामुळे नागरिकांना पाणी मिळत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे. बाजारपेठ येथील मुख्य रस्त्यालगत पशु दवाखान्याजवळ पाण्याची पाईप लाईन फुटल्याने गेल्या 10 दिवसापासून प्रभाग क्रमांक 9 येथील पाणी पुरवठा बंद आहे.
 
 
फुटलेल्या पाईप लाईनवर प्रशासनाचे दुर्लक्ष असून येथील दुरुस्तीचे काम सुद्धा 5 दिवसापासून ठप्प असल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नगरपंचायतवर धडक दिली. येत्या पाच दिवसात जर पाणी पुरवठा सुरु झाला नाही तर नगरपंचायत कार्यालयासमोर घागर आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी माजी नगरसेवक धनराज थूल, भूषण यावले, दिलीप शापामोहन यांच्यासह अन्य महिला उपस्थित होत्या.