चेहर्‍याची ओळख पटवूनही डाउनलोड होणार आधार

    दिनांक :08-Apr-2021
|
नवी दिल्ली,
आधार डाउनलोड करण्यासाठी चेहर्‍यावरून ओळख पटविणारे (फेस ऑथेंटिकेशन) नवे फिचर आले आहे. आधार कार्डधारक व्यक्ती आभासी व्यासपीठावरून आपल्या चेहर्‍याच्या मदतीने आधार कार्ड डाउनलोड करू शकणार आहे.
 
nat_1  H x W: 0
 
यासाठी युआयडीएआय अर्थात् आधारच्या संकेतस्थळावर जाऊन फेस ऑथेंटिकेशन फिचरची मदत घ्यावी लागेल. हे फिचर विना ओटीपी कार्य करते. या फीचरचा वापर करण्यासाठी आधार केंद्रावर जाण्याची गरज भासत नाही. संकेतस्थळाच्या मुख्य पानावर गेट आधार कार्ड हा पर्याय निवडून त्यातील फेस ऑथेंटिकेशनचा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला आपला नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांक टाकावा लागेल. त्यानंतर हे फिचर चेहरा स्कॅन करून आपल्याला आधारकार्ड उपलब्ध करून देणार आहे.