कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लहान मुलांसह गर्भवती बाधित

    दिनांक :08-Apr-2021
|
नवी दिल्ली, 
कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लहान मुले, तरुण आणि गर्भवती मोठ्या संख्येत बाधित होत असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी म्हटले आहे. आरोग्य क्षेत्रातून यावर चिंता व्यक्त करण्यात येत आहे. मागील जानेवारी महिन्यात कोरोना संकट काहीसे थांबल्याचे दिसून येत असतानाच फेब्रुवारी महिन्यात ते नव्याने उसळून आले.
 
nat_1  H x W: 0
 
या संसर्गाची दुसरी लाट अत्यंत धोकादायक असून, पहिल्यापेक्षाही अधिक परिणामकारक असल्याचे सांगण्यात येते. यात आता लहान मुले, तरुणवर्ग, गर्भवती यांनाही आपल्या कवेत घेतले आहे. नवी दिल्लीतील लोकनायक रुग्णालयाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सुरेश कुमार यांच्यानुसार, दुसरी लाट ही पहिल्यापेक्षा तीव्र गतीने पसरत आहे. मागील आठवड्यात रुग्णालयात 20 रुग्ण दाखल झाले होते. आता ही संख्या 170 वर पोहोचली आहे. पहिल्या लाटेत बहुतांशपणे वयस्कर लोक बाधित ठरले होते. आता मात्र बालकांसह तरुण आणि गर्भवतींनाही महामारीने ग्रस्त केले आहे. हा एक नक्कीच चिंताचा विषय आहे. लोकनायक रुग्णालयाने या दुसर्‍या लाटेला रोखण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबईतील हार्टकेअर फाऊंडेशन ऑफ इंडिया आणि कन्फडरेशन ऑफ मेडिकल असोसिएशन ऑफ आशियाचे अध्यक्ष डॉ. के. के. अग्रवाल यांच्यानुसार, महिला आणि बालकांमध्ये कोरोनाचे लक्षण कमी प्रमाणात दिसून येते. परंतु, या दुसर्‍या लाटेच्या काळात त्यांनाही सावध राहणे अत्यंत जरूरी आहे.