नवी दिल्ली,
कझाकिस्तानचे संरक्षण मंत्री लेफ्टनंट जनरल नूरलान येरमेकबायव बुधवारी चार दिवसीय भारत दौर्यावर आले आहेत. जोधपूर विमानतळावर त्यांचे आगमन झाले, अशी माहिती सूत्रांनी दिली. येरमेकबायव जैसलमेर, नवी दिल्ली आणि आग्रा येथे बैठकीसाठी आणि संरक्षण आस्थापनांना भेट देण्यासाठी आले आहेत.
शुक्रवारी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांवर त्यांची बैठक देखील पार पडणार आहे. कझाकिस्तानच्या संरक्षणमंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांचा हा पहिला भारत दौरा आहे. यापूर्वी दोन्ही मंत्र्यांची भेट 5 सप्टेंबर 2020 रोजी शांघाय सहकार संघटनेच्या परिषदेदरम्यान मॉस्को येथे झाली होती.