रशियाने जपानी समुद्रात डागले कॅ लिबर क्रूझ क्षेपणास्त्र

    दिनांक :08-Apr-2021
|
मॉस्को, 
रशियन नौदलाच्या गाईडेड मिसाईल फ्रिगेट मार्शल शापानशिकोव्हने मंगळवारी जपानच्या समुद्रात कॅ लिबर क्रूझ क्षेपणास्त्र डागले. एका चाचणीच्या निमित्ताने हे क्षेपणास्त्र डागण्यात आल्याचे रशियाने आपल्या एका निवदेनात म्हटले आहे.
 
int_1  H x W: 0
 
माहितीनुसार, मार्शल शापानशिकोव्हने जपान समुद्रात केप सेर्कुम फायरिंग रेंजमध्ये पहिल्यांदाच जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे कॅ लिबर क्षेपणास्त्र डागले. विशेष म्हणजे ते सुमारे एक हजार किमी अंतरावरील लक्ष्याचा वेध घेण्यास सक्षम आहे. दुसरीकडे युक्रेनच्या माध्यमातून अमेरिकासोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर रशियाने आपली युद्धसज्जता वाढवली आहे. नौदलाच्या उत्तर फ्लीटला सक्रिय केल्यानंतर राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी पॅसेफिक फ्लीटलादेखील गस्त वाढवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पॅसिफिक महासागर क्षेत्रात रशियाशिवाय जपान आणि अमेरिकेचेही सैन्य गस्त घालत असतात. मागील काही दिवसांपासून यात चीनचाही समावेश झाल्याने युद्धाची स्थिती निर्माण होते की काय, अशा शंका निर्माण झाल्या आहेत.