टी-20 विश्वचषक स्पर्धा ठरल्यानुसार होणार : आयसीसी

    दिनांक :08-Apr-2021
|
नवी दिल्ली, 
यावर्षी भारतात होणार्‍या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी आमच्याकडे पर्यायी व्यवस्था आहे, परंतु सद्यःस्थितीत कोरोनामुळे स्पर्धा इतरत्र हलविण्याचा कोणताही विचार नाही व स्पर्धा ठरल्यानुसारच होणार आहे, असे आयसीसीचे अंतरिम मुख्य कार्यकारी अधिकारी जिऑफ अ‍ॅलार्डीस यांनी बुधवारी म्हटले आहे.
 
sports_1  H x W
 
भारताच्या यजमानपदाखाली ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. गत काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या दररोज एका लाखाच्यावर गेली आहे. कोरोनाच्या पृष्ठभूमीवर शुक्रवारी चेन्नईत प्रेक्षकांच्या अनुपस्थितीत आयपीएल क्रिकेट मोसमाला सुरुवात होणार आहे. नियोजित कार्यक्रमानुसार आमची पुढील वाटचाल सुरू असल्याचेही ते म्हणाले. आमच्याकडे पर्यायी योजना आहे, परंतु अद्याप आम्ही त्या योजना सक्रिय केल्या नाही. आम्ही बीसीसीआयच्या संपर्कात आहो आणि गरज भासल्यास आम्ही पर्यायी योजनेवर कार्य करू शकतो, असेही ते म्हणाले.