अमेरिकेत 19 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वांनाच लस

    दिनांक :08-Apr-2021
|
वॉशिंग्टन, 
कोरोना संसर्गाचा सर्वाधिक फटका बसलेल्या अमेरिकन नागरिकांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अमेरिकेत 19 एप्रिलपासून 18 वर्षांवरील सर्वांनाच कोरोनाप्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी ही घोषणा केली. अमेरिकेत आतापर्यंत 15 कोटी नागरिकांचे लसीकरण झाले आहे.
 
int_1  H x W: 0
 
राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर 100 दिवसांमध्ये 10 कोटी लोकांचे लसीकरण करण्याचा निर्धार बायडेन यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर अवघ्या 75 दिवसांमध्ये 15 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. आगामी 25 दिवसांमध्ये आणखी 5 कोटी जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट बायडेन प्रशासनाने ठेवले आहे. लोकसंख्येतील बहुतांश नागरिकांचे जोवर लसीकरण होत नाही, तोपर्यंत कोरोनाबाबतच्या नियमांचे पालन करायचे आहे, असे आवाहन त्यांनी केले. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे 5 लाख 54 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधित आणि मृतांच्या आकड्यांबाबत जगात अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.