लसीचा दुसरा डोस घेतांना पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

    दिनांक :08-Apr-2021
|
 - नागरिकांना लसीकरण करण्याचं आवाहन
 नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीच्या एम्स रुग्णालयात जाऊन कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. आता मोदी  यांनी एखादी गोष्ट केली आणि त्याची चर्चा झालीच नाही, असे फार अपवादाने घडते. यावेळीही त्यांची एक कृती अनेकांच्या नजरेतून सुटली नाही. कदाचित हीच गोष्ट ध्यानात ठेवून यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसरा डोस घालताना तोंडावर मास्क घातल्याचे दिसून आले. त्यामुळे आता मोदींच्या टीकाकारांना त्यांच्यावर टीका करण्यास कोणताही मुद्दा मिळणार नाही.

pm _1  H x W: 0
 
मार्च महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्स रुग्णालयातच कोव्हॅक्सीन लसीचा पहिला डोस घेतला होता. त्यावेळी करण्यात आलेल्या फोटोसेशनमध्ये नरेंद्र मोदींचा हसरा चेहरा चर्चेचा विषय ठरला होता. पंतप्रधान मोदी इतरांना मास्क वापरण्याची सूचना करतात. मात्र, फोटोसेशनसाठी मोदींनी स्वत:ही मास्क काढून ठेवल्यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. पंतप्रधान मोदी यांनी कोरोना लसीची पहिला डोस 1 मार्चला घेतला होता. त्यांनी स्वदेशी बनावटीची कोव्हॅक्सिन ही लस टोचून घेतली होती. त्यानंतर आज त्यांनी या लसीचा दुसरा डोस घेतला. कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी उपलब्ध असलेल्या मोजक्या मार्गांपैकी लस हा एक मार्ग आहे. तुम्ही लसीकरणासाठी पात्र असाल तर तात्काळ लस घेऊन टाका, असा संदेश यावेळी पंतप्रधान मोदी यांनी दिला.