20 जणांच्या चाचणीत 12 कोरोनाबाधित

    दिनांक :02-May-2021
|
गाडेगाव, 
हिंगणघाट तालुक्यातील कानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणार्‍या गाडेगाव येथे आज 2 रोजी घेण्यात आलेल्या 20 जणांच्या कोराना अ‍ॅन्टीजन चाचणीत सरपंच, आशासेविका यांच्यासह 12 जण कोरोनाबाधित आढळून आल्याने गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुसरीकडे गावात विलगीकरणाची कुठलीही व्यवस्था नसल्यामुळे कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

fd_1  H x W: 0  
 
गावात कोरोना लक्षण असणार्‍यांची संख्या अधिक आहे. कानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावात कोरोनाची अ‍ॅन्टीजन चाचणी घेण्यात आली. यात 20 पैकी 12 जण कोरोनाबाधित आढळून आले. कोरोना बाधितांना गृहविलगीकरणात ठेवणे अपेक्षीत होते. बाधितांवर कसल्याही प्रकाचे बंधन नसल्याने ते गावात फिरत असल्याचे दिसून येत आहे. गावात लक्षण असणार्‍यांची संख्या वाढत असून चाचणी सकारात्मक येईल या भीतीने कुणी चाचणी करण्यास तयार होत नाही.
 
 
गावात आढळून आलेल्या कोरोनाबाधितांना सक्तीच्या गृहविलगीकरणात ठेवण्यात यावे तसेत गाव निर्जंतुकीकरण करण्यात यावे अशी गावकर्‍यांनी मागणी केली आहे. या वेळी कोरोना चाचणी शिबिरात कानगाव आरोग्य केंद्राचे आरोग्य सेवक बी. बी. भीसे, व्ही. डब्ल्लू. मोहर्ले, छाया तराळे, पौर्णिमा थुल यांनी रुग्णांची चाचणी केली. यावेळी उपसरपंच संघपाल डुबडुबे, राजू गिरी, सविता भोयर उपस्थित होत्या.