जिल्ह्यात 804 नवे बाधित, 689 बरे

    दिनांक :02-May-2021
|
- 19 रुग्णांचा झाला मृत्यू
अमरावती, 
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या गेल्या पाच दिवसानंतर रविवारी थोडी कमी झाली. 804 नवीन रूग्णांची नोंद झाली आणि 19 मृत्यू झाले. 689 रूग्ण बरे होऊन घरी गेले. शनिवारी तर 980 ही आतापर्यंतच्या सर्वाधिक बधितांची नोंद झाली होती.
 
dsgs_1  H x W:
जिल्ह्यात आतापर्यंत 67 हजार 501 कोरोनाग्रस्त झाले आहे. त्यापैकी 8,233 रूग्ण क्रियाशील असून त्यातील 7 रुग्णांना नागपूरात हलविण्यात आले आहे. 6,318 गृह विलगीकरणात आहे. उर्वरित कोविड रुग्णालयात उपचार घेत आहे. आजपर्यंत 58 हजार 285 रूग्ण बरे झाले आहे. तो दर 86.35 टक्क्यांवर आला आहे. जिल्हा शल्य चिकीत्सकांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात अमरावती जिल्ह्यातल्या 17 व अन्य जिल्ह्यातल्या 2 रुग्णांचा समावेश आहे.
 
 
जिल्ह्यातल्या मृतकांमध्ये धामणगाव रेल्वे येथील 51 वर्षीय महिला, परतवाडा येथील 52 वर्षीय महिला, अचलपूर येथील 90 वर्षीय पुरुष, वरुड येथील 82 वर्षीय महिला, परतवाडा येथील 82 वर्षीय महिला, मोर्शी येथील 79 वर्षीय पुरुष, चांदुर बाजार येथील 52 वर्षीय पुरुष, वरुड येथील 53 वर्षीय पुरुष, परतवाडा येथील 57 वर्षीय महिला, धामणगाव रेल्वे येथील 58 वर्षीय पुरुष, अंजनगाव बारी येथील 35 वर्षीय पुरुष, घोडगाव येथील 51 वर्षीय पुरुष, धामणगाव रेल्वे येथील 50 वर्षीय पुरुष, धारणी येथील 76 वर्षीय पुरुष, वरुड येथील 49 वर्षीय महिला, पथ्रोट येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 983 जणांचा मृत्यू झाला आहे. अन्य जिल्ह्यातल्या मृत्यूची नोंद वेगळी घेण्यात आली आहे. जिल्ह्यातले मृत्यूचे प्रमाण वाढले असून ते 1.46 टक्क्यांवर आहे. नव्याने बाधित रूग्णांवर उपचार सुरू करण्यात आले असून त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू झाला आहे.
 
 
कंटेन्मेंट झोनचे निकष काटेकोरपणे पाळा 
कंटेन्मेंट झोनबाबत शासनाने दिलेल्या सूचनांनुसार काटेकोरपणे नियम पाळण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी शनिवारी अचलपूर येथे दिले. ग्रामीण भागातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी नवाल यांनी अचलपूर व चांदुर बाजार तालुक्यांना भेट देऊन रुग्णालयांची पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्यासह तहसीलदार, वैद्यकीय अधिकारी, नपा अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ग्रामीण भागात कोरोनाबधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे आवश्यक तिथे तपासण्या व वेळेत उपचाराला गती द्यावी. ऑक्सिजन बेडची संख्या वाढवावी. याबाबत आवश्यक ती सामग्री मिळवून देण्यात येईल. गृह विलगिकरणाचे नियम रुग्णांनी काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे. त्यासाठी संपर्क, देखरेख, समन्वय नियमित ठेवावा.