प्राणवायू निर्मितीसाठी महानिर्मिती गतिमान

    दिनांक :02-May-2021
|
नागपूर 
महानिर्मितीच्या खापरखेडा, कोराडीसह सर्व वीज केंद्रांमधील ओझोनायझेशन प्लांटमधून त्या-त्या परिसरातील गंभीर कोरोनाग्रस्तांना ऑक्सिजनचा पूरक पुरवठा करण्यासाठी अतिशय गतिमान पावले उचलली जात आहेत. या वीज केंद्रांद्वारे वैद्यकीय ऑक्सिजन पुरवठा साध्य होणार आहे.
 
 
cyc_1  H x W: 0
 
कोरोनाच्या आव्हानात्मक काळात महानिर्मितीने सातत्यपूर्ण वीजनिर्मितीसह काही वीज केंद्रातील ओझोन प्लांटमधून परिसरातील रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा तातडीने करण्यासाठी कंबर कसली आहे. औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाèया पाण्यात शेवाळ- सूक्ष्मजंतू होऊ नयेत यासाठी त्या पाण्यावर ओझोनायझेशन प्लांटद्वारे रासायनिक प्रक्रिया केली जाते.
 
 
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजय खंदारे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा कामाला लागली. खापरखेडा वीज केंद्रातील सद्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांट कामठी उपजिल्हा रुग्णालयात स्थानांंतरित करून तिथून प्रति तास ४२ घनमीटर या क्षमतेने एक ते दीड महिन्यातच ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे.
 
 
कोराडी वीज केंद्र परिसरातच रिफिqलग/बॉटलिंग प्लांट उभारण्याचा तिसरा टप्पा आहे. यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त आवश्यक ते कॉम्प्रेसर्स, फिल्टर्स व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री तातडीने विदेशातून आयात/देशांतर्गत उपलब्ध करून हा टप्पा साकार केला जाईल. कोराडी वीज केंद्राद्वारे दररोज तब्बल १००२ जम्बो सिलेंडर्स ऑक्सिजन निर्मिती साध्य करण्यात येईल. महानिर्मितीच्या या एकूणच तत्पर प्रतिसादाबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी संपूर्ण महानिर्मिती टीमचे कौतुक केले आहे.