चणा विक्रीचे चुकारे झाले सुरू

    दिनांक :02-May-2021
|
- 106 शेतकर्‍यांना दिलासा
सिंदी (रे.),
येथील खरेदी- विक्री सहकारी संस्थेमाध्यमातून नाफेडला चणा विकलेल्या शेतकर्‍यांना चुकारे मिळत नव्हते. त्याची दखल तरुण भारतने घेतली. वृत्त प्रसिद्ध होताच जिल्हा व्यवसाय विक्री अधिकारी ठाकूर यांनी 106 शेतकर्‍यांना तातडीने धनादेश देण्यात यावे, अशी सूचना केली आहे.
 
gfdh_1  H x W:
 
दीड महिन्यात नाफेडने सेलू तालुक्यातील शेकडो शेतकर्‍यांचा चणा खरेदी करुन गोदामात ठेवला. त्यात सेलू येथील 3 हजार 217 क्विंटल व सिंदीच्या केंद्रावरुन 2 हजार 985 क्विंटल हरभर्‍याचा समावेश आहे. गुढीपाडवा झाला तरी पैसे मिळाले नाही. दुसरीकडे बँकांचे व्याज वाढत आहे, असल्याचे वृत्त तरुण भारतमधून प्रकाशीत करण्यात आले.
 
 
या ज्वलंत समस्याची दखल राज्य सरकारने घेतली व पहिल्या टप्प्यात येथील 50 शेतकर्‍यांना 49 लाख 49 हजार 853 रुपये तर सेलूच्या 56 चणा उत्पादक शेतकर्‍यांना सुमारे 46 लाखांचा चुकारा सोमवार 3 पासून मिळणार असल्याची माहिती खविसचे प्रतिनिधी रमेश नाकतोडे यांनी दिली आहे. तरुण भारतने शेतकर्‍यांची व्यथा मांडल्याचा हा परिणाम आहे, असे मत माजी नगराध्यक्ष व विकासोचे संचालक सुरेश सोनटक्के यांनी नोंदविले.