जिल्ह्यात आज 1003 कोरोना बाधीत, आठ जणांचा मृत्यू

    दिनांक :02-May-2021
|
- आजपर्यत 65 हजार 982 कोरोना बाधीत
 
बुलडाणा, 
जिल्ह्यातील कोरोना अहवालानुसार एकूण 4810 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 3807 अहवाल कोरोना नकारात्मक असून 1003 अहवाल बाधीत प्राप्त आले आहे. बाधीत अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 652 व रॅपीड टेस्टमधील 351 अहवालांचा समावेश आहे. नकारात्मक अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 533 तर रॅपिड टेस्टमधील 3274 अहवालांचा समावेश आहे. 3807 अहवाल नकारात्मक आहेत.
 
gfnh _1  H x W:
 
उपचारादरम्यान दुर्गापुरा, दे. राजा येथील 21 वर्षीय पुरुष, जानेफळ ता. मेहकर येथील 46 वर्षीय पुरूष, खंडाळा ता. मेहकर येथील 66 वर्षीय पुरुष, सज्जनपुरी खामगाव येथील 75 व 60 वर्षीय पुरूष, खामगाव येथील 65 वर्षीय पुरुष व 82 वर्षीय महिला, तिवडी ता. जळगाव जामोद येथील 62 वर्षीय पुरुष रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
 
 
आजपर्यंत 363212 नकारात्मक प्राप्त झाले आहेत. आजपर्यंत 58630 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना नकारात्मक असल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. सुट्टी देण्यात आलेल्या रूग्णांची एकूण संख्या 58630 आहे. आज रोजी 5878 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. आजपर्यंत एकूण नकारात्मक अहवाल 363212 आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 65982 कोरोनाबाधित रूग्ण असून त्यापैकी 58630 कोरोनाबाधीत रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रूग्णालयात 6933 कोरोना बाधीत रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 419 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.