वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या सेवा घेण्यासाठी पाठपुरावा - ना. केदार

    दिनांक :02-May-2021
|
वर्धा, 
कोरोना काळात रुग्णांच्या वाढत्या संख्येला डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, नर्सेस यांची कमतरता जाणवत आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शनानुसार वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्ष, नर्सिंगच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी तसेच पॅथॉलॉजीच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची सेवा घेण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आपल्या जिल्ह्यासाठी मनुष्यबळ उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री सुनील केदार यांनी सांगितले.
 
ghg_1  H x W: 0
 
ध्वजारोहण कार्यक्रमानंतर ना. केदार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित अधिकार्‍यांच्या बैठकीत ते बोलत होते. सेवाग्रामच्या कस्तुरबा कोविड समर्पित रुग्णालयाला 400 खाटांसाठी अखंडित ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त 20 के एल द्रव प्राणवायू टँकरद्वारे पुरवण्यासाठी भिलाई येथून पुरवठा करण्यासाठी अतिरिक्त मागणी कळवावी, अशा सूचना पालकमंत्री सुनील केदार यांनी दिल्या. जिल्ह्यातील औद्योगिक कामासाठी वापरले जाणारे प्राणवायू सिलेंडर सद्यस्थितीत रुग्णालयासाठी उपलब्ध करून देण्याबाबत सर्व एमआयडीसीमधील उद्योगांना आदेश द्यावे, असे ना. केदार यांनी सांगितले.
 
 
सेवाग्राम रुग्णालयात सध्या 300 खाटा आहेत आणखी 100 खाटा सुरू करण्यासाठी प्राणवायू पुरवठ्याची तयारी करण्यात येत आहे. साधन सामग्री आणि मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याची मागणी माजी आ. सागर मेघे यांनी केली. या बैठकीला जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, माजी आ. सागर मेघे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, सेवाग्राम आयुर्विज्ञान महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. नितीन गंगणे, डॉ. अभ्युदय मेघे, आदी उस्स्थित होते.