गोंदिया 662 रुग्णांची कोरोनावर मात

    दिनांक :02-May-2021
|
- नवे 572 बाधित, सहा रुग्णांचा मृत्यू

गोंदिया,
जिल्ह्यात कोरोना संसर्गावर मात करणार्‍या बाधितांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. सोबतच गत दोन दिवसात मृतक रुग्णसंख्याही घटली आहे. जिल्हावासीयांसाठी ही बाब दिलासादायक आहे. रविवार, 2 मे रोजी 662 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर 572 नवे बाधित आढळले असून सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
 
vh_1  H x W: 0
 
जिल्ह्यात आतापर्यंत 34,165 कोरोना बाधित आढळले असून 28,215 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आता 5,400 सक्रिय रुग्ण औषधोचार घेत असून 550 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. रविवारी आढळलेल्या बाधितांमध्ये गोंदिया तालुक्यात 247, तिरोडा 27, गोरेगाव 64, आमगाव 37, सालेकसा 4, देवरी 81, सडक अर्जुनी 94, अर्जुनी मोर 12 व अन्य राज्यातील 6 रुग्णांचा समावेश आहे.
 
 
तर गोंदिया तालुक्यातील 374 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून तिरोडा 65, गोरेगाव 11, आमगाव 70, सालेकसा 23, देवरी 50, सडक अर्जुनी 25, अर्जुनी मोर 33 व अन्य राज्यातील 11 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. बरे होणार्‍या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याने गुरुवारी असलेल्या 64 कंटेन्मेंट झोन कमी झाले असून आता 54 झोनमध्ये 911 रुग्णांचा समावेश आहे. आता 4,686 तपासणी चाचणीचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.