पालकमंत्री केदार यांनी केले मुख्य ध्वजारोहण

    दिनांक :02-May-2021
|
वर्धा,
कोविड विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 1 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम साधेपणाने आणि कोरोनाच्या मार्गदर्शक नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांनी ध्वजारोहण केले. तसेच पोलीस विभागाची मानवंदना स्विकारली.
 
fdnh_1  H x W:
 
यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बडे ,अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, तहसीलदार रमेश कोळपे, आदी उपस्थित होते.