बाधितांपेक्षा मुक्त झालेल्यांची वाढली संख्या

    दिनांक :02-May-2021
|
- 1044 कोरोनामुक्त, 1458 नवे बाधित, तर 25 मृत्यू
चंद्रपूर,
जिल्ह्यात मागील 24 तासात बाधितांपेक्षा मुक्त झालेल्यांची संख्या वाढल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. एकाच दिवशी 1 हजार 44 जणांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत 62 हजार 895 जण बाधित झाले असून, त्यापैकी 45 हजार 132 जणांनी कोरोनावर मात केली आहे. 1458 बाधितांची नव्याने भर पडली असून, 25 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
dsgs_1  H x W:
 
सध्या 16 हजार 809 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 84 हजार 693 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3 लाख 16 हजार 906 नमुने नकारात्मक आले आहेत. रविवारी मृत झालेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील सरकार नगर येथील 73 वर्षीय पुरुष, कृष्णानगर येथील 38 वर्षीय पुरुष, तुकूम येथील 43 व 63 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष. बल्लारपूर तालुक्यातील संतोषीमाता वार्ड येथील 54 व 73 वर्षीय पुरुष, विसापूर येथील 75 वर्षीय महिला,42 वर्षीय पुरुष, राजुरा तालुक्यातील 64 वर्षीय पुरुष, धानोरा येथील 62 वर्षीय पुरुष. भद्रावती तालुक्यातील 41 वर्षीय महिला, वरोडा तालुक्यातील शेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, विनायक लेआउट परिसरातील 51 वर्षीय महिला, 65 वर्षीय महिला. नागभीड तालुक्यातील तळोधी येथील 58 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष. ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगर परिसरातील 78 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय पुरुष, टिळक नगर येथील 45 वर्षीय महिला. चिमूर तालुक्यातील 42 वर्षीय पुरुष, सरडपार येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, कोरपना तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
 
 
जिल्ह्यात आतापर्यंत 954 बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 884, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 28, यवतमाळ 27, भंडारा नऊ, गोंदिया एक आणि वर्धा एक, नागपूर येथील दोन बाधिताचा समावेश आहे. रविवारी बाधीत आलेल्या 1458 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील 352, चंद्रपूर तालुका 84, बल्लारपूर 87, भद्रावती 110, ब्रम्हपुरी 66, नागभिड 25, सिंदेवाही 99 , मूल 79, सावली 49, पोंभूर्णा 21, गोंडपिपरी 42, राजूरा 52, चिमूर 57, वरोरा 203, कोरपना 118 व इतर ठिकाणच्या 14 रुग्णांचा समावेश आहे.