पंतप्रधान निधीतून कोरोना मृतकांच्या कुटुुंंबांना आर्थिक मदत द्या - माजी मंत्री सुबोध सावजी

    दिनांक :02-May-2021
|
बुलडाणा,
भारतात एक महिन्याच्या कालावधीत कोरोनाचा बंदोबस्त करण्यासाठी 135 करोड नागरिकांना लस देण्यासाठी कार्यक्रम पुर्ण करण्यात यावा. कोरोना कार्यकाळात भारतात कोरोनाने जे मृत्युमुखी झालेले आहेत. त्यांच्या कुटुंबाला पंतप्रधान निधीमधून कमीत कमी 5 लाख तर जास्तीत जास्त 15 लाख रूपये आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
 
ghn _1  H x W:
 
भारत देशात लॉकडाऊन लावल्यानुसार कोरोनावर नियंत्रण मिळू शकले नाही. कोरोना सर्वात जास्त वाढला आहे. आज भारतातील दवाखान्याने हॉऊसफुल झाले आहेत. त्यांना औषधी सुद्धा मिळत नाही. त्यामुळे रूग्णांचे मृत्यू होत आहे. समाजाने सार्वजनिक व धार्मिक कार्यक्रम सुद्धा बंद केले आहे. यामुळे व्यापार्‍याचे हाल होत आहे. कोरोनामुळे शिक्षण सुद्धा बंद झाले आहे. त्यामुळे तहसिलात मोफत सुसज्य 200 खांटाचे दवाखाने सुरू करा. काही दवाखान्यात ऑक्सीजन कमी प्रमाणात आहे. त्या ठिकाणी ऑक्सीजन बाहेर देशातून पाठविण्याची व्यवस्था करण्यात यावी. या गंभीरता विचार करून अंमलबाजवणी करण्यात यावी अशी मागणी सुबोध सावजी यांनी केली आहे.